बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावातील आणि शहापूर मधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.गेल्या अनेक वर्षापासून ही रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. बेळगावातील श्री लक्ष्मी वेंकटेश मंदिराच्या रथोत्सवात शेकडो भाविक रथ ओढण्यासाठी सहभागी झाले होते. व्यंकटरमण गोविंदाचा गजर रथ ओढताना भक्त करत होते.शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मंदिराकडे रथोत्सवाची सांगता झाली. 

शहापूर मधील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाला तीनशे वर्षाची परंपरा आहे.नवरात्रीत नऊ दिवस विविध रुपात देवाचे पालखी प्रमाणे वाहन काढण्यात येते. रथोत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते.रथाच्या अग्रभागी महिला टिपरी खेळत होत्या तर भजन मंडळाच्या भगिनी भजन गात होत्या.रथाच्या मार्गावर अनेक ठिकाणी सडे रांगोळी घालून स्वागत करण्यात येत होते अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.