बेळगाव : बेळगाव  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्ती घटक समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष  दीपक दळवी व कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.