बेळगाव / प्रतिनिधी
दसरा (विजयादशमी) सणाचे औचित्य साधून शनिवारी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.शहरातील राणी चन्नम्मा सर्कलजवळील कडा कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर खासदारांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, आमदार रमेश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य प्रदीप शेट्टी, माजी खासदार मंगला अंगडी, बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महापौर सविता कांबळे, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, महांतेश कवठगीमठ, माजी आमदार संजय पाटील, जगदीश मेटगुड, विश्वनाथ पाटील आदि उपस्थित होते.
0 Comments