सुळगा (हिं.) / वार्ताहर
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर देश आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री. दुर्गामाता दौडला बेळगाव शहरासह तालुक्यात गुरूवार दि. ३ ऑक्टोबर पासून सुरूवात झाली.
बेळगाव तालुक्यात विभिन्न पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसात बेळगाव शहरासह तालुक्याच्या विविध भागात श्री. दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. ही दौड सर्वांचेच लक्ष आकर्षित करते. धर्म जागृतीसाठी होत असलेल्या श्री. दुर्गामाता दौडमध्ये धारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेतात. दरम्यान प्रतिवर्षीप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (हिं.) येथेही घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर श्री. दुर्गामाता दौडला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी गुरूवारी सकाळी ५.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लक्ष्मी गल्ली येथून दौडीची सुरूवात झाली. तत्पूर्वी बाळू यल्लाप्पा चौगुले यांच्या शुभहस्ते ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र, श्री गणेश, दुर्गामाता आणि छत्रपती शिवरायांची आरती म्हणून पहिल्या दिवशीच्या दौडला चालना देण्यात आली. गावातील विठ्ठल मंदिरनजीक विठ्ठल - रुक्मिणी भजनी मंडळाच्यावतीने दौडचे स्वागत करण्यात आले.
यावेळी गल्लोगल्ली सुहासिनींनी आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले. दौडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेल्या बालचमू आणि युवा वर्गाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दौडमधील धारकऱ्यांनी श्लोक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करत परिसर दणाणून सोडला होता. पुढे लक्ष्मी गल्ली, ब्रम्हलिंग गल्ली, कलखांबकर मळा, देशपांडे कॉलनी, गणपत गल्ली, संभाजी गल्ली, शंकर गल्ली, मरगाई गल्ली, आंबेडकर गल्ली, वेंगुर्ला रोड, कोवाडकर गल्ली, मारूती गल्ली मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लक्ष्मी गल्ली येथे आल्यानंतर ध्येयमंत्र म्हणून बाळू यल्लाप्पा चौगुले यांच्याहस्ते ध्वज उतरविण्यात आला. यानंतर दौडची सांगता झाली.
या दौडीमध्ये श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा (हिं.) विभागप्रमुख शेखर पाटील यांच्यासह गावातील प्रमुख धारकरी, युवक - युवती, यांच्यासह लहान बाळगोपाळ सहभागी झाले होते.
- उद्या दि. ४ ऑक्टोबर रोजी दौडचा मार्ग :
0 Comments