खानापूर : आपली मातृभाषा व सरकारी शाळा वाचविण्या व टिकविण्याबाबत रविवार दि. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता शिवस्मारक खानापूर येथे विश्वभारती कला क्रीडा संघटना उपशाखा खानापूर यांच्यावतीने पुन्हा भव्य अभियान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाली (ता. खानापूर) येथे मीटिंग घेऊन जनजागृती करण्यात आली

यापूर्वी दि. २२ सप्टेंबर रोजी शिवस्मारक खानापूर येथे अभियान घेऊन जनजागृती करण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्याप्रमाणे हे अभियानही यशस्वी व्हावे याकरिता एसडीएमसी कमिटी आणि खानापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तरी  शिक्षणप्रेमी, समाजसेवक व हितचिंतक यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक अनिल सताप्पा देसाई यांनी केले आहे.