- शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांची पत्रकार परिषद
- सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय नाहीत का??
- शहर पोलिस आयुक्तांवर पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून हिंडलगा येथे पहाटे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या १५ दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये झाली आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
यावर आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी हिंडलगा व मारिहाळ येथील चोरी प्रकरणी कारवाई करून ८० हजार रुपये किंमतीचे सोन्या - चांदीचे दागिने तसेच चोरीत वापरलेल्या २ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती दिली.
शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांवर पोलीस विभाग कारवाई का करत नाही? पोलिस विभाग चोरीच्या गुन्ह्यांचा तपास संथ गतीने का करत आहे? चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय नाहीत का? त्यांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही का? असा सवाल करत प्रसारमाध्यमांनी शहर पोलिस आयुक्तांना खडेबोल सुनावले. बेळगाव शहरात स्मार्टसिटीच्या वतीने एकूण २८० सीसी कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांनी स्पष्ट केले. मात्र स्मार्टसिटीलाच त्यांचे व्यवस्थापन करणे कठीण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच बैठकीत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments