सुळगा (उ.) : येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य तथा जनसेवेसाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता श्री. कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील, यांचे शुक्रवार (दि.१८) ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्याकरिता उद्या शनिवार (दि.२६) ऑक्टोबर रोजी ब्रह्मलिंग मंदिर सुळगा (उ.) येथे सायंकाळी ठीक ४ वा. शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेला शिरूरचे श्री कोंडीबा महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे .
शट्टूप्पा (बाळू) यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह हितचिंतकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी बाळू यांच्या कुटुंबियांसह सर्वांना धीर मिळावा, या उद्देशाने सुळगा (उ.) येथील समस्त ग्रामस्थ, ज्येष्ठ व्यक्ती, युवा वर्ग, माता-भगिनी आणि त्यांच्या हितचिंतकांच्या पुढाकारातून सदर शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
तरी या शोक सभेसाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी केले आहे.
0 Comments