सौंदत्ती / वार्ताहर 

दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार खोल दरीत कोसळून अपघात झाला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यात श्री यल्लम्मा देवस्थान परिसरात सौंदत्ती पोलीस स्थानकच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार सौंदत्तीहून यल्लम्मा देवस्थानाकडे जात असताना दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकीसहित तो खोल दरीत कोसळला. या घटनेची माहिती स्थानिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला दिल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाची सुटका केली. अग्निशमन दलाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.