• बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावानजीक घटना 

बैलहोंगल / वार्ताहर 

बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावाजवळ बोलेरो वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात  दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. राघवेंद्र कोलकार (वय २२ रा. नागलापुर, ता.बैलहोंगल) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातावेळी बोलेरो गाडी सेंट्रिंगचे साहित्य भरून बेळगावहून बैलहोंगलकडे निघाली होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.