बेळगाव / प्रतिनिधी
सार्वजनिक शिक्षण खाते बेळगांव वतीने जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा बेळगाव मधील संत मिरा इंग्लिश मिडियम शाळा अनगोळ बेळगांव येथे संपन्न झाल्या. या मध्ये बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थीनी सहभागी होत्या.प्राथमिक मुलींच्या गटात बेळगाव ग्रामीण मधील बेळगांव पब्लिक स्कूल शिंदोळी या शाळेला अंतिम सामन्यात 11/0 अशा फरकाने हरवून प्रथम क्रमांक पटकावला आणि माध्यमिक गटाने बेळगांव ग्रामिण मधील डिव्हाईन मर्सी शाळेला 10/03 फरकाने हरवून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. येत्या 15-16 सप्टेंबर रोजी धारवाडला होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याचा संघ म्हणून बालिका आदर्श विद्यालय प्रतिनिधित्व करणार आहे .
प्राथमिक गटात शिवानी शेलार ,समृद्धी पाटील, आदिती कोरे, सेजल धामणेकर , ऋुतुजा जाधव,श्रेया मजुकर, श्रेया खन्नुकर, श्रद्धा कंणबरकर अंकिता आयरेकर या मुलींचा संघात सहभाग होता तर माध्यमिक गटात वैष्णवी नार्वेकर ,वृषाली छपरे, प्रतिज्ञा मोहीते, अनन्या अनगोळकर अनगोळकर , ऋतूजा सुतार, स्वानंदी पावले, गीता शिंदे, स्त्रेजल जाधव, शिवानी धुंडूम आदी खेळाडूंचा या संघात समावेश होता, स्त्रेजल जाधव हिने सर्वादीक 6 गोल केले व आदिती कोरे हीने सर्वाधिक 4 गोल केले. या खेळांडूना शाळेचे चेअरमन जी. एन. फडके, सहसचिव आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ.डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे .
0 Comments