बेळगाव : माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणि संस्थेचा संस्थापना दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी विद्यार्थ्यांच्या गांधी भजनापासून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. संस्थेचे गौरव कार्यदर्शी श्री. चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी प्रस्ताविकपर स्वागत भाषण केले. संस्थेचे पहिले उपाध्यक्ष श्री.आनंद जोशी यांनी अतिथींचा परिचय करून देत त्यांचा पुष्पगौरव केला.
अतिथी ॲड. श्री. एम.जे.एफ गुरुदेव सिद्धापूरमठ, उद्योगपती श्री.राजेंद्र पै यांनी महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री यांच्या भावचित्राची पूजा केली. याप्रसंगी विद्यार्थिनी कु. खुशी नायकर, कु. कीर्ती कुंभार यांनी भाषणे केली. याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री. नारायण हेडा, श्री. चंपालाल जैन, श्री.भालचंद्र गोविंद गाडगीळ, यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अतिथींनी संस्था व शाळेचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषण श्री. वादिराज कलघटगी यांनी केले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी सदस्य श्री. चंद्रशेखर बेंबळगी, श्री. गणेश हेगडे, श्री. राजशेखर हिरेमठ, श्री. अशोक चिंडक, श्रीमती. कीर्ती रजपूत, श्री. शिरीष मालू, श्री. नंदकिशोर निखार्गे, श्री. कांतेश आचार्य, श्री. बालकिसन भट्टड, श्री. राजेंद्र जैन, श्री. राजेंद्र मुंदडा व इतर पदाधिकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदि उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनीता गावडे यांनी सर्वांचे आभार मानले. श्रीमती. सुमिता मिटगार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
0 Comments