- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने आयोजन
सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेळगाव तालुक्याच्या सुळगा (हिं.) गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र उत्सवामध्ये दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार समजून घेण्यासाठी ही दौड प्रेरणादायी ठरते. श्री शिवछत्रपती अखंड दौडले, लढले, झगडले त्यांच्या रक्तातील आग, रग, धग, लढाऊपणा आजच्या तरुण पिढीच्या रक्तात येणे अत्यंत आवश्यक आहे व सर्वांना एकत्र आणणे हाच या दौडचा उद्देश आहे.
तरी गावातील लहान मुले, युवा वर्ग, महिला तसेच ज्येष्ठांनीही या दौडमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
- दुर्गामाता दौडचा मार्ग खालील प्रमाणे :
पहिला दिवस - गुरुवार दि. ३/१०/२०२४ रोजी पहाटे ५.३० ला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लक्ष्मी गल्ली येथून सुरुवात व संपूर्ण गाव फिरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लक्ष्मी गल्ली येथे सांगता.
0 Comments