- ऐतिहासिक विजयासह घरच्या मैदानावर केला विक्रम
कानपूर : भारताने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा व्हाईटवॉश करून मोठी कामगिरी केली. कानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला.
या विजयामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल पाचवा दिवशी असा लागेल याचा कोणी विचारही केला नव्हता. कारण पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दोन दिवसात निकाल लागेल अशी काही वाटत नव्हतं. पण भारतीय गोलंदाज आणि फलंदाज यांनी जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजांनी पहिल्यांदा आपली भूमिका चोखपणे बजावली. त्यानंतर फलंदाजांनी आपला आक्रमक अंदाज दाखवला. पहिल्या डावात बांगलादेशने 233 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत अवघ्या 35 षटकात 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेतली. यात सिंहाचा वाटा राहिला तो यशस्वी जयस्वालचा. त्याने पहिल्या डावात 51 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. यात त्याचा स्ट्राईक रेट हा 141.18 इतका होता. यशस्वी जयस्वाल दुसऱ्या डावातही चमकला. आक्रमक अंदाज त्याने कायम ठेवत दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावलं.
यशस्वी जयस्वालने 43 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. यावेली त्याचा स्ट्राईक रेट हा 116.28 इतका होता. विजयासाठी अवघ्या 3 धावा असताना यशस्वी जयस्वाल हसन मिराजच्या गोलंदाजीवर झेल देत बाद झाला. त्याने 45 चेंडूत 51 धावांची खेळी केली. खरं तर या कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वाल फॉर्मसाठी झुंजत होता. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात सूर गवसला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. दुसऱ्या सामन्यातील चांगल्या कामगिरीसाठी यशस्वी जयस्वालला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
0 Comments