बेळगाव / प्रतिनिधी 

बिल देण्याच्या मुद्द्यावरून हॉटेल मालक आणि गॅंगवाडीमधील चार तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सदाशिवनगर येथील आय हॉटेलमध्ये घडली. सदर चार युवक पार्टी करून येथे जेवणासाठी आले होते. यामधील तिघांनी आपले बिल भरले मात्र एकाने आपले बिल भरले नाही. यादरम्यान हॉटेल मालक आणि युवकांमध्ये वादावादी सुरु झाली. हॉटेल मालक, कर्मचारी आणि युवकांमध्ये होत असलेला वाद सुरूच राहिला.यावेळी हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेला बीएसएफचा एक जवान परशुराम रामगोंड गोंधळ मिटवण्यासाठी गेला. 

यावेळी सदर बीएसएफ जवानाचे गॅंगवाडी येथील चार तरुणांपैकी एकाशी  बोलणे झाले.  यामध्ये बीएसएफचा जवानाने त्या युवकावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. 

अल्ताफ चौगुले (रा. गॅंगवाडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर परशुराम रामगोंडानावर असे युवकाच्या पोटात सूरी खुपसणाऱ्या बीएसएफ जवानाचे नाव असून त्याची हालचाल सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकात संतोष लोंढे यांनी तक्रार दाखल केली आहे. एपीएमसी पोलिसांनी सदर बीएसएफ जवानाला अटक करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.