•  विश्वभारती कला क्रीडा संघटना उपशाखेतर्फे आयोजन 

खानापूर / अनिल देसाई 

आपली मातृभाषा व सरकारी शाळा वाचविण्या व टिकविण्याबाबतच्या अभिनयांतर्गत जनजागृतीसाठी दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता शिवस्मारक खानापूर येथे विश्वभारती कला क्रीडा संघटना उपशाखा खानापूर यांच्यावतीने भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेला ज्ञानवर्धनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान पीटर डिसोझा उपस्थित राहणार आहेत. 

तरी तालुक्यातील प्रत्येक गावच्या शाळा सुधारणा समितीचे सदस्य, शिक्षणप्रेमी, समाजसेवक व हितचिंतक यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक श्री. अनिल सताप्पा देसाई यांनी केले आहे.