• डॉ. एस. एस. गुडेद नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. महेश कोणी यांच्या बदलीचा आदेश शासनाने काढला आहे. डॉ. महेश कोणी यांच्या जागी  शासनाने डॉ. एस. एस. गुडेद यांची नियुक्ती केली आहे. 

डॉ. महेश कोणी यांनी कोरोना संकटाच्या काळात बेळगाव जिल्ह्यात केलेल्या चांगल्या कामाबद्दल जनतेतून त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच साथीचे आजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती केल्याबद्दल ते जिल्ह्यात लोकप्रिय होते.