बेळगाव : बेंगळूर येथे २०२१ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबने विरोधात धर्मवीर संभाजी महाराज चौक बेळगाव येथे झालेल्या आंदोलना दरम्यान दंगल घडवून शांतता भंग केल्याच्या आरोपावरून विविध गुन्ह्यांतर्गत खडेबाजार, मार्केट व कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एकूण सात खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी खडेबाजार पोलिस स्थानकातील दोन खटल्यांमध्ये आज निकाल देण्यात आला. या निकालात सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
बेळगावच्या तृतीय प्रथम दिवाणी न्यायालयाने हा निकाल दिला. यामध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, समिती नेते मदन बामणे, शुभम शेळके,माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सर्वांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील ॲड. महेश बिर्जे, ॲड. शामसुंदर पत्तार,ॲड. प्रताप यादव, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. रीचमॅन रिकी नवग्रह, ॲड.हेमराज बेंचन्नवर यांनी न्यायालयीन काम पाहिले.
0 Comments