- शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई
- पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांची माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यात येणार असून बेळगाव शहरात पोलीस विभागातर्फे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी दिला आहे.
आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईद - ए - मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले असून रविवारी होणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून शांततेत मिरवणूक काढण्याची सूचना करण्यात आली आहे. यापूर्वीदेखील शांतता समितीची बैठक पार पडली असून गणेशोत्सवाप्रमाणेच ईद - ए - मिलाद ची मिरवणूक शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
मिरवणूक काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अतिरिक्त अधिकाऱ्यांचा वापर करून सुरक्षा पुरवली जात असून गन बस, केएसएआरपी, सीएसएफ, एआरएफएस, सीपीआय, एसीपी, इन्स्पेक्टर, पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड आणि इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
0 Comments