• राष्ट्रीय महामार्गालगत वंटमुरी गावानजीक घडली घटना 

बेळगाव / प्रतिनिधी 

चालकाचे नियंत्रण सुटलेला एक ट्रक पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या मार्कंडेय नदीपात्रात कोसळला. सदर ट्रक संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येत होता. वंटमुरी (ता. बेळगाव) गावानजीक हा अपघात घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अपघातावेळी चालकाने ट्रकमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.

या घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साह्याने ट्रक पाण्याबाहेर काढला.  या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.