(पाणवठ्यावरून सजविलेल्या गौरी घरोघरी घेऊन जाताना
पारंपरिक पेहरावातील महिला) 
फोटोसौजन्य : सौ. राजश्री रोहन पाटील 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

सुळगा (हिं.) व परिसरातील गावात गणपतीच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी मंगळवारी गौराईचेही मोठ्या उत्साहात आगमन झाले. गौरीच्या आगमनासाठी सकाळपासून महिला व तरुणींनी पारंपरिक वेश धारण केला होता. महिलांनी पाणवठ्यावरून म्हणजेच विहिरीवरून गौर आणली. 

तत्पूर्वी तांब्याला सजवून फुले, दुर्वा, आगाडा घालून गौरीचे पूजन केले. लहान मुली, तरुणी, महिलांनी साडी परिधान करत डोक्यावर गौरी घेऊन घरोघरी आनंदाने स्वागत केले. 


त्यानंतर गौर बसवण्यात आली. मुकुट, नथ, बांगड्या मंगळसूत्र याशिवाय अनेक दागिने घालून गौर सजवण्यात आली. यावेळी परंपरेप्रमाणे भाजी - भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. काही घरी शेपू आणि भोपळ्याच्या पानांची भाजी केली जाते. काही ठिकाणी मेथीची भाजी करण्यात आली. यानिमित्ताने महिलांमध्ये उत्साह दिसून आला.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇