उडुपी : करकला-धर्मस्थळ महामार्गावर आज (३० सप्टेंबर) रोजी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
पाजेगुड्डे, होसमारू, करकाला तालुका, उडुपी येथे एका ट्रकची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकीवरून जाणारे वडील आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. सुरेश आचार्य (वय ३६), समिक्षा (वय ७), सुष्मिता (वय ५) आणि सुशांत (वय २) यांचा मृत्यू झाला. सुरेश आचार्य यांच्या पत्नी मीनाक्षी आचार्य (वय ३२) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments