अथणी / वार्ताहर 

अथणी तालुक्यातील हल्याळ येथील करीमसुती सिंचन पाटबंधारे कालव्याजवळ शौचास जात असताना एक युवक घसरून कालव्यात पडल्याची घटना घडली आहे.

अथणी तालुक्याच्या हल्याळ गावातील शिवराय मल्लाप्पा कांबळे (वय २१) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आपल्या दोन मित्रांसमवेत पहाटे या भागात शौचासाठी जात असताना पाणी आणण्यासाठी गेले असता ही  दुर्देवी घटना घडली आहे. पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊन तरुणाचा मृत्यू झाला असून पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने युवकाचा मृतदेह काढण्यात आला आहे. याप्रकरणाची नोंद अथणी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.