- वन्यप्राण्यांचे मांस - हरणाची शिंगे जप्त ; दोघांना अटक
खानापूर / प्रतिनिधी
घोटगाळी (ता. खानापूर) ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील जांबेगाळी गावातील एका घरावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकला. यावेळी घरामध्ये बेकायदेशीररीत्या साठवलेले वन्य प्राण्यांचे मांस व हरणाची शिंगे जप्त करण्यात आली असून महमदअली हालसीकर व मौलाली हालसीकर (दोघेही रा. जांबेगाळी ता.खानापूर) यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्ती आणि छाप्यामध्ये सापडलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नागरगाळी झोन वन अधिकारी यांच्या कार्यालयात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments