• घटनास्थळी आढळला १५ लि.अवैध मद्यसाठा 

अथणी / वार्ताहर 

अथणी शहराच्या हद्दीतील चमकेरी क्रॉसजवळ दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले. दुचाकीस्वार हारूगेरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून अपघातस्थळी १५ लि. अवैध मद्यसाठा सापडला आहे. महाराष्ट्रातील घुगवाड गावातून कर्नाटकच्या सीमाभागात बिनदिक्कत मद्य विक्री सुरू आहे.

मटका आणि मद्यामुळे सीमाभागातील तरुण व्यसनाधीन होत असतानाही पोलिस खात्याचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अशा सीमावर्ती भागात दररोज राजरोसपणे मद्य वाहतूक सुरू असल्याने स्थानिक पोलिस विभागाने यावर कडक कारवाई अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.