- भारतीय कृषी संघटनेच्यावतीने बेळगावात आंदोलन
- राज्य सरकारचा नोंदविला निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील फुले, फळे, चिंच, केळी यांची विक्री करणारे खासगी मार्केट एपीएमसीमध्ये स्थलांतरित करावे, या मागणीसाठी भारतीय कृषी संघटनेच्यावतीने आज शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवनापासून आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धगौडा मोदगी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव शहरातील खासगी मार्केटमध्ये फुले, फळे, चिंच, केळी यांची अवैध विक्री होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
0 Comments