- राज्यपालांनी दिलेला चौकशीचा निर्णय ठेवला कायम
बेंगळूर : म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (मुडा) घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाविरोधात सिद्धरामय्या यांनी दाखल केलेली याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने युक्तिवाद ऐकून राज्यपालांचा चौकशीचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि सिद्धरामय्या यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले. सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील मुडा प्रकरण पीपल्स कोर्टात हलवण्यात आले असून, याचिकाकर्ते टीजे अब्राहम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे.
प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले सिद्धरामय्या मुडा प्रकरणात हरले आहेत. मुडा प्रकरण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराला काळीमा फासणारी बाब आहे.
0 Comments