चिक्कोडी / वार्ताहर 

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील नागरमुन्नोळीनजीक ही  घटना घडली. सिद्रामा चौगला (वय ४३, रा. नागरमुन्नोळी ; ता. चिक्कोडी ; जि बेळगाव) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.