बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या गांधीनगर ब्रिजजवळ मारुती ८०० कारला अचानकआग लागून ती जळून खाक झाल्याची घटना घडली. 

गांधीनगर ब्रिजवरून हलगा मार्गे जाणाऱ्या मारुती ८०० कारने अचानक पेट घेतल्याने कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या कारमधून दोघे जण प्रवास करत असल्याची माहिती उपलब्ध झाली असून कारच्या समोरील भागाला आग लागताच दोघांनीही पळ काढल्याने दोघे सुखरूप बचावले आहेत.