- पोषण आहार अंडी वाटपातील भ्रष्टाचाराच्या आरोपा विरुद्धची याचिका फेटाळली
निपाणी / प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सुरेंद्र उगारे यांनी माजी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून शासनाकडून महिला व बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी वाटपाच्या निविदेत बेकायदेशीरित्या लाचखोरी केल्याचा आरोप केला आहे. शशिकला जोल्ले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारकडून मुलांना दिली जाणाऱ्या अंड्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याची बातमी सगळीकडे होती.
शशिकला जोल्ले यांच्या बाजूने एकही साक्षीदार नसला तरी दोन स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले असून त्यांना विलंब झाला आहे. त्यानुसार, १२ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयात साक्ष न दिल्यामुळे खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
निपाणी दिवाणी न्यायालयाने माजी मंत्र्याला खटल्याचा पाठपुरावा करण्यात रस नसल्याचे सांगत याचिका फेटाळून लावली आहे.
0 Comments