खानापूर / प्रतिनिधी
खानापूरच्या माजी आमदार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव आणि दादरा - नगर हवेलीच्या निवडणूक प्रभारी डॉ.अंजली निंबाळकर यांनी दादरा आणि नगर हवेलीचा दौरा करून काँग्रेस पक्षाच्या संघटनेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.अंजली निंबाळकर यांचे स्वागत करून काँग्रेस पक्षाच्या संघटनेबाबत माहिती दिली. पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
0 Comments