कराड : सातारा जिल्हा भाजप निवडणूक प्रभारी धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शक्ती केंद्रप्रमुख व भाजप नेत्यांची महत्वाची बैठक झाली.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत जमखंडीचे माजी आमदार श्रीकांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष विक्रम पावसकर, मंडळ अध्यक्ष धनंजय पाटील, शहर मंडळ अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
0 Comments