बेळगाव / प्रतिनिधी 

उद्या मंगळवारी बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यास शतकोत्तर परंपरा आणि ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करणार आहेत.त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू असून तीन हजाराहून अधिक पोलिसांवर विसर्जन मिरवणूक पार पाडण्याची जबाबदारी आहे. 

शहरात गणपती विसर्जन मिरवणूक मंगळवारी आहे. त्यादिवशी दुपारी विसर्जन मिरवणूक सुरू होते.दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विसर्जन मिरवणूक चालते. त्यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गावर कडे जाणारे रस्ते बंद करून पर्यायी मार्ग वाहतुकीला दिला जाणार आहे. त्यामुळे पर्यायी वाहतुकीच्या बदलांबाबत आयुक्तालयाकडून लवकरच पत्रक काढण्यात येणार आहे. दरम्यान उद्या होत असलेल्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर पोलिसांनी पथसंंचालन केले.