• अपघातामुळे पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी 

तवंदी / वार्ताहर 

पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळ तवंदी घाटात रविवारी सायंकाळी ५.३० वा. दोन कंटेनर, दोन कार आणि दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

या अपघातात किती जण ठार झाले याची खात्रीशीर माहिती अद्यापही मिळालेली नाही. मात्र मृतांचा आकडा चार पेक्षा जास्त असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या अपघातामुळे पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने बराच वेळ अडकून पडली होती. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कंटेनरच्या धडकेत कारचा आणि दुचाकीचा चक्का चूर झाला आहे. दरम्यान संकेश्वर, निपाणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात नेमका कसा घडला आणि मृतांची संख्या मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.