• ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू 

बेळगाव / प्रतिनिधी 

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तलावात सापडल्याची घटना बेळगावच्या वडगाव येथील मंगाईनगर घडली. बेळगाव येथील वडगावमधील मंगाईनगर तलावात आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही व्यक्ती दोन-तीन दिवसांपूर्वी पाण्यात पडली असावी, अशी माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे. ही घटना शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.