बेळगाव / प्रतिनिधी
वीस वर्षांपूर्वी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने बेळगावच्या कुवेंपुनगरमध्ये ३३ गुंठे जमीन संपादित केली. याविरोधात जमीन मालकाने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने बेळगाव शहर विकास प्राधिकरणाला सदर जमीन मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत.
२० फेब्रुवारी २००४ रोजी बेळगावातील कुवेंपूनगर येथील ३३ गुंठे जमीन बुडाकडून संपादित करण्यात आली. यावेळी जमिनीचे मूळ मालक राजेंद्र देसाई यांनी तीव्र विरोध व्यक्त केला. त्यांना कोणताही मोबदला न देता बुडाने या जमिनीवर १३ प्लॉट पाडून त्यांचा लिलाव केला. सदर जमीन विकत घेतलेल्या जागामालकांनी घरेही बांधली. मात्र जमीन मालक देसाई यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या याचिकेवर उच्च तीन महिन्यांच्या आत ३३ गुंठे जमीन मूळ मालकाला परत करावी, असे आदेश दिले आहेत. जिथे जमीन परत करणे शक्य नाही त्या ठिकाणी नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.
0 Comments