- बेळगाव पोलिस आयुक्त ईडा मार्टिन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील कर्ले गावात रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांनी दिली.
बुधवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, कर्ले गावातील मोहन तलवार (वय ५२) यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा सुगावा लागला असून, लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल. मात्र हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ते आरोपींना अटक केल्यानंतर समजेल असे त्यांनी सांगितले.
बेळगावात पार्किंगची समस्या असलेल्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. याबाबत लवकरच महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले. शहरात घरफोडी,दुकान चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी विशेष टीम तयार करून पुन्हा असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेतली जाईल. जनतेने पोलीस विभागाला सहकार्य करावे. चोरी झाल्यास, थेट ११२ वर कॉल करा असेही त्यांनी सांगितले .
0 Comments