• नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
  • नाल्याची समस्या सोडविण्याची मागणी 

बळ्ळारी नाल्यासंदर्भात जिल्हाप्रशासनाला निवेदन
देताना शेतकरी 

बेळगाव / प्रतिनिधी 

बळ्ळारी नाल्यामुळे  गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी बळ्ळारी नाल्याची समस्या सोडविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

गेल्या १ महिन्यापासून बेळगाव शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस पडत आहे. आता बळ्ळारी नाला ओसंडून वाहत असून, शेतवडीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.  धामणे, येळ्ळूर, वडगाव, अनगोळ, शहापूर, कित्तूर  यासह विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बळ्ळारी नाल्यात येत आहे.  नाल्यानजीक  शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी शिरले असून, ६०० एकरातील पिकांचे नुकसान झाले आहे. याला आळा घालण्यासाठी कारवाई करावी, तसेच बळ्ळारी नाल्याचे पाणी वाहून अन्यत्र पसरत जाऊ नये यासाठी काँक्रीट कालवा बांधण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी शेतकरी कीर्ती कुलकर्णी यांनी वडगाव, येळ्ळूर, अनगोळ, अलारवाड, मुचंडी येथील शेतकरी आज आंदोलन करत असून, बळ्ळारी  नाल्याचे पाणी त्यांच्या शेतात शिरले आहे.  बळ्ळारी  नाल्याच्या पाण्याने विहिरी व बोअरवेल नष्ट होत आहेत. बेळगाव शहर आणि गावांजवळ. "बळ्ळारी  नाला "  ३२ किमी लांबीचा असून तो पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेत आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, यासाठी दरवर्षी आम्ही या संदर्भात प्रत्येक सरकारकडे निवेदने दिली आहेत. याबाबत जिल्हापालकमंत्र्यांसह बैठक झाली आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्यास लढा देणार असा संताप व्यक्त केला.

याप्रसंगी शेतकरी सुधारणा मंडळाचे सदस्य रमाकांत कोंडुसकर, मनोहर हलगेकर, कीर्ती कुलकर्णी, अमोल देसाई यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.