- हुक्केरी तालुक्याच्या जुने वंटमुरी येथील घटना
हुक्केरी / वार्ताहर
हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुने वंटमुरी गावात विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने १३ गुरे ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार गावातील तिघेजण एकत्र येऊन गुरे चारायला गेले होते. सायंकाळी पाऊस पडल्याने ते आपली गुरे घरी घेऊन जात असताना जुने वंटमुरीनजीक रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांब कोसळल्याने विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन १३ गुरे दगावली. यामध्ये मुत्तप्पा बसरगी यांच्या ४ गायी २ बैल, लक्ष्मण अप्प्या किलरगी यांच्या १ गाय १ म्हस आणि यल्लवा निंगाप्पा गस्ती यांच्या ५ गायी जागीच मृत्यूमुखी पडल्या.
दरम्यान घटनेची माहिती मिळतच ग्रामविकास अधिकारी विठ्ठल बुकनट्टी, महसूल निरीक्षक सी. के. कळकंबकर, पीएसआय एस.के. मन्निकेरी, पशुवैद्यकीय अधिकारी सिद्धार्थ मोकाशी, मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मारुती गुटागुड्डी यांनी भेट दिली.
0 Comments