सौंदत्ती / वार्ताहर
बोअरवेलचे पाणी पिल्याने ४१ हून अधिक जण आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथे घडली. एका महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वजण आजारी होते.
सोमवारी अचानक तब्येत बिघडल्याने ग्रामस्थांना उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. घरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमधील दूषित पाणी पिल्याने सर्व आजारी पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बोअरवेलमधून टाकीमध्ये पाणी भरून ते घरापर्यंत पुरविले जात असल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आमदार महांतेश कौजलगी, जिल्हाधिकारी डॉ. महेश कोणी यांनी रुग्णालयाला भेट दिली.
0 Comments