बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधील महावीर कॉलनी, मारुतीनगर येथील घरात सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. तरी संसारोपयोगी साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र १ लाख ८० हजार रोख आणि ३५ ग्रॅम सोने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. चन्नाप्पा लमाणी हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. याच माध्यमातून त्यांनी रोख रक्कम आणि दागिने साठवून ठेवले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले असून माळमारुती पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली.
0 Comments