दिल्ली : बेळगाव लोकसभा मतदार संघाचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी बेळगावातील सर्वांगीण रस्ते विकासाचे निवेदन त्यांनी मंत्री नितीन गडकरींना सादर केले.
बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर - होनगा दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या बायपास रस्ता (रिंगरोडच्या) बांधकामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम तातडीने हाती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी आवाहनात केल्या आहेत.
कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल ते बेळगाव शहराला जोडणारा सम्राट अशोक चौक मार्ग राष्ट्रीय महामार्ग - ४ ला जोडणारा फ्लायओव्हर बांधण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात कर्नाटक राज्य सरकारने केंद्र सरकारला यापूर्वीच 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे.
0 Comments