बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव मार्कंडेयनगर येथे सोमवार (१ जुलै) रोजी डॉक्टर्स डे निमित्त माजी आमदार अनिल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमहापौर रेश्मा पाटील यांनी डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या लसीकरण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते करण्यात आले. डॉक्टर्स डे सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून डॉ. गिरीश, डॉ.आरती यांच्यासह शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मार्कंडेयनगर येथील शेकडो नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
या शिबिरात भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा केकरे, संतोष, नीला चौघुले, प्रवीण पाटील, आदित्य पाटील, ज्योती मुतगेकर यांच्यासह मार्कंडेयनगर येथील रहिवासी सहभागी झाले होते.
0 Comments