बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना तसेच शासकीय, अनुदानित विना अनुदानित, प्राथमिक प्रौढ व अंगणवाडी केंद्रांना दि. २२ आणि २३  जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा आदेश बजावला आहे.