खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांचीही उपस्थिती होती.

खानापुर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देऊन सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्था, नदी-नाल्यांची पाणी पातळी त्यांनी तपासली. तालुक्यातील कुसमळी गावातील पुलाची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.