• पीडितांशी चर्चा करून जाणून घेतल्या समस्या

 आ. शशिकला जोल्ले मानकापूर काळजी केंद्रातील
 स्थलांतरितांची विचारपूस करताना 

चिक्कोडी / वार्ताहर 

आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघातील मानकापूर, मंगुर बारवाड, चांद शिरदवाड या गावांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघातील मानकापूर गावाला भेट देऊन पूरस्थिती, काही घरात शिरलेले पाणी आणि पिकांचे नुकसान व घरांच्या नुकसानीचा अहवाल देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

त्याचवेळी मानकापूर गावात शेजारील पीडितांसाठी सुरू करण्यात आलेल्या काळजी केंद्राला भेट दिली, पीडितांच्या समस्या ऐकल्या, ज्यांची घरे गेली, उगवलेली पिके पाण्याखाली गेली, पीडित काळजी केंद्रात असतानाही सरकारी पीडितांसाठी जेवण व ब्लँकेटची व्यवस्था केली नाही, ही बाब निदर्शनास आल्याने तहसीलदार पीडीओ .व ग्रामलेखापालांना कडक सूचना दिल्या.

यावेळी तहसीलदार, नोडल अधिकारी ए. एस. पुजारी, पीडीओ नंदकुमार पप्पे, ग्राम लेखापाल एम. ए. सनदी, विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.