नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि फलंदाज अंशुमन गायकवाड यांचे रक्ताच्या कर्करोगामुळे (ब्लड कॅन्सर) गुरुवारी रात्री निधन झाले, ते ७१ वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये उपचार घेतले. गेल्याच महिन्यात ते भारतात परत आले होते.
अंशुमन गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ४० कसोटी आणि १५ वनडे सामन्यांमध्ये भारताचचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी बीसीसीआयचे निवड समिती सदस्य आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. गायकवाड प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघ २००० साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेता ठरला होता.
0 Comments