•  श्रीराम सेना - मोदगा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

मोदगा (ता. बेळगाव) येथील मारुती मंदिराची जमीन लवकरचं मंदिर विश्वस्त समितीकडे सोपवावी यासाठी मोदगा ग्रामस्थ व श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन दिले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक म्हणाले, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराची जमीन नसीर बागवान यांच्याकडे हस्तांतरित केली होती. त्यामुळे जमीन मंदिर विश्वस्त समितीच्या ताब्यात मिळेपर्यंत श्रीराम सेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ लढा देत राहतील आणि मंदिराची जमीन त्यांच्या ताब्यात दिली नाही, तर पुढच्या महिन्यात ग्रामस्थ, ट्रस्ट आणि श्रीराम सेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.