• टिळकवाडी पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी 

दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत बेळगावच्या टिळकवडी पोलिसांनी आरोपींना अटक करत तब्बल ७ लाखांच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत.

बेळगाव शहरातील विविध स्थानकात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, पोलीस उपायुक्त पी.व्ही.स्नेहा, सहाय्यक पोलिस आयुक्त एच. शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक ,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने २४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत वीरभद्रनगर, बेळगाव येथील रहिवासी हैदरअली शेख, अमननगर येथील रहिवासी नदीम शमसुद्दीन टोपीगार या आरोपींना अटक करत त्यांच्याकडून ७ लाख रुपये किमतीच्या एकूण १० दुचाकी जप्त केल्या आहेत.

या कारवाईत  टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजेरी, पीएसआय संतोष दलवाई, सीएचसी महेश पाटील, सोमलिंग करलिंगन्नावर, सीपीसी संजू संगोटी मल्लिकार्जुन पात्रोट, लाडजीसाब मुलतानी, तांत्रिक विभागाचे कर्मचारी रमेश अक्की यांचा सहभाग होता. या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी कौतुक करून बक्षीस घोषित केले आहे.