खानापूर / प्रतिनिधी
खानापूर - हेम्मडगा - अनमोड मार्गावर मणतुर्गा जवळ, रेल्वे फाटक नजीक असलेल्या, हालत्री नदीवरील पुलावर पाणी आल्याने, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या असोगा - मणतुर्गा या पर्यायी मार्गावरून दुचाकी व कार गाड्यांची वाहतूक सुरू आहे. परंतु बस व अवजड वाहतूक बंद आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, या पुलाची उंची वाढविण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या उद्भवत असून, दरवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास, या पुलावर पाणी येत असते, पावसाळ्यात असे दोन ते तीन वेळा पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांना व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाची उंची फारच कमी असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) खात्याने व लोकप्रतिनिधींनी या बाबत गांभीर्याने विचार करून, पुलाची उंची वाढविल्यास या भागातील २५ - ३० गावच्या नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा व वाहनधारकांचा, हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
0 Comments