• धरणाचे दोन दरवाजे दोन इंचानी खुले

(फोटो आणि  व्हिडिओ सौजन्य : सौ. पूजा  दीपक पाटील,
राकसकोप, वार्ताहर) 

बेळगाव / प्रतिनिधी

राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे गुरुवारी सायंकाळी दोन इंचानी खुले करण्यात आले आहेत. राकसकोप जलाशय भरण्यासाठी अद्यापही दोन फूट पाण्याची गरज आहे. मात्र जलाशय आवारात पावसाची संततदार सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढतच आहे. यामुळे जलाशयाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयाचे दरवाजे लवकर खुले करण्यात आले आहेत. राकसकोप जलाशय आवारात पाऊस सुरूच असल्यामुळे पाण्याची आवकही वाढतच आहे. गत १३ दिवसात १२ फूट पाणी वाढले आहे.

- या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇 -

  
  • मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा :

बेळगाव शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. शहराच्या पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जलाशयातील अतिरिक्त पाणी धरणातून सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग झाला आहे. त्यामुळे राकसकोप धरणाच्या बाजूस मार्कंडेय नदी नाल्याच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा पाणीपुरवठा मलनिसारण मंडळाने दिला आहे.